‘राजा शिवछत्रपती’ परिवारातील १०० जणांनी केली परंडा येथील भुईकोट गडाची स्वच्छता !

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने येथील ऐतिहासिक भुईकोट गडाच्या ठिकाणी ‘राजा शिवछत्रपती’ परिवारातील एकूण १०० जणांनी ५ जून या दिवशी स्वच्छता अभियान राबवून गड संवर्धनाचा संदेश दिला.

नुपूर शर्मा यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहरातील ‘मुस्लिम कमिटी’कडून अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला.

‘फ्रिंज’ नव्हे, ‘मेनस्ट्रीम’च !

‘अन्ते मती सा गती ।’ यानुसार काँग्रेसची समीप आलेली मृत्यूघंटा तिला स्वत:ला दिसत नाही. त्यामुळे ती आताही हिंदूंना विसरत आहे. हीच मती (बुद्धी) पाहून हिंदू तिला राजकीयदृष्ट्या अधो‘गती’ देण्यास सज्ज झाले आहेत, हे तिने विसरू नये ! कालाय तस्मै नम: । दुसरे काय ?

सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ४ सहस्र रुपये स्वीकारतांना तलाठ्यांना अटक !

छोट्या छोट्या कामांसाठीही पैसे मागणारे अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत. तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी कुणी लाच मागितल्यास लाच देऊ नका, लगेचच तक्रार करा !

अपयशाकडे कसे पहाल ?

जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागते. लहानपणापासूनच अपयशाकडे कसे पहायचे ? हे मुलांना शिकवल्यास संपूर्ण जीवनात कधीही अपयश पदरी पडले, तरी मुले डगमगणार नाहीत किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत, हे नक्की !

संभाजीनगर येथे फर्निचरच्या दुकानात बाँबसदृश वस्तू !

येथील कन्नड शहरातील एका फर्निचरच्या दुकानातील भ्रमणभाषच्या खोक्यात बाँबसदृश वस्तू सापडली आहे. ९ जून या दिवशी सकाळी दुकानदाराने भ्रमणभाषचे खोके उघडून पाहिले असता त्यात बाँबसारखी वस्तू आढळली.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. पुष्पा हराळे यांचे वडील भागीरथ शिंदे (वय ७२ वर्षे) यांचे ८ जून या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता उगाव (तालुका निफाड, जिल्हा नाशिक) येथील रहात्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ऑनलाईन अर्जांतील त्रुटीमुळे नगर जिल्ह्यातील आदिवासींचा ४ कोटींचा निधी परत गेला !

शासकीय अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

हिंगोली येथे ८ गावांमधील केळीच्या बागांना वादळी वाऱ्याचा तडाखा !

जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने ९ जून या दिवशी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.

सनातनची साधिका कु. ऐश्वर्या योगेश जोशी हिला १२ वीच्या परीक्षेत ८० टक्के गुण !

सनातनच्या आश्रमात रहाणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची साधिका कु. ऐश्वर्या योगेश जोशी हिला १२ वीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के (६०० पैकी ४८२) गुण मिळाले आहेत. ती मिरज येथील ‘ज्युबिली ज्युनियर कॉलेज’ची विद्यार्थिनी आहे.