ठाणे – भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात मुंबई, मुंब्रा, भिवंडी यानंतर आता अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहरातील ‘मुस्लिम कमिटी’कडून अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला.