घाटकोपर (मुंबई) – येथील सनातनच्या साधिका सौ. पुष्पा हराळे यांचे वडील भागीरथ शिंदे (वय ७२ वर्षे) यांचे ८ जून या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता उगाव (तालुका निफाड, जिल्हा नाशिक) येथील रहात्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भागीरथ शिंदे हे वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, २ स्नुषा, ३ मुली, ३ जावई आणि ११ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार हराळे आणि शिंदे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.