(‘सिंगल यूज प्लास्टिक’ म्हणजे एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिक)
नवी देहली – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘सिंगल यूज प्लास्टिक’वर (एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकवर) बंदी घालण्यासाठी कठोर नियम बनवले आहेत. यामुळे आता १ जुलैपासून कुणी ‘सिंगल यूज प्लास्टिक’ विकतांना अथवा वापरतांना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने म्हटले आहे.
कोणत्या वस्तूंवर येणार बंदी ?
फुग्यांची प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे ध्वज, कँडी/आईस्क्रीम स्टिक, थर्माकॉल, प्लास्टिक प्लेट/कप, प्लास्टिक पॅकिंगचे सामान, प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा अल्प जाडी असलेले प्लास्टिक)
प्लास्टिक वापरणार्यांवर कोणती कारवाई होणार ?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या आदेशानुसार कोणत्याही दुकानात ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरले गेल्यास त्या दुकानाचा व्यापार परवाना (ट्रेड लायसन्स) रहित करण्यात येईल. यानंतर हा परवाना पुन्हा मिळवण्यासाठी दुकानदाराला दंड भरून पुन्हा अर्ज करावा लागेल.
संपादकीय भूमिकाभारतात अनेक नियम आणि कायदे बनवले जातात; परंतु प्रत्येक वेळी त्यामध्ये पळवाटा काढल्या जातात. भ्रष्टाचाराचे नवा मार्ग उघडला जातो. त्यामुळे जनहिताचे नियम करणे एकांगी असून त्यांची कठोर कार्यवाही आणि कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करणारी जनता निर्माण होणे आवश्यक आहे. असे आतापर्यंत होऊ न शकणे, हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ? |