नवी देहली – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये भरतीसाठी अग्नीपथ योजनातील सैनिक ‘अग्नीवीर’ यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला. या दलांमधील भरतीसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली होती.
काँग्रेसकडून अग्नीपथ योजनेला विरोध करण्यात येणार आहे. १९ जून या दिवशी देहलीतील जंतरमंतरवर काँग्रेस आंदोलन करणार आहे. दुसरीकडे १८ जून या दिवशी ‘बिहार बंद’ आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थी संघटनेने या बंदचे आवाहन केले होते. त्याला राष्ट्रीय जनता दल, साम्यवादी पक्ष आदींनी पाठिंबा दिला होता.
Agnipath scheme: MHA announces reservation of 10% vacancies in CAPFs, Assam Rifles for Agniveers https://t.co/W40YENl9Y1
— TOI India (@TOIIndiaNews) June 18, 2022