सरगुजा (छत्तीसगड) येथे शिवमंदिरात तोडफोड

हिंदु संघटनांकडून राष्ट्र्रीय महामार्ग बंद !

सरगुजा (छत्तीसगड) – येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले.

तोडफोडीच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. येथील तणावाच्या स्थितीमुळे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे बृजभूषण याला अटक केली आहे. त्यानेच दारूच्या नशेत तोडफोड केल्याचे चौकशीत मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. (छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेला संशयित हाच आरोपी आहे का ? कि कुणालातरी वाचवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकून त्याला आरोपी करण्यात आले आहे, अशी शंका येते ! – संपादक)