झारखंडमध्ये १२ अल्पवयीन मुलांचे अवैध धर्मांतर करणार्‍या चर्चला जिल्हा प्रशासनाकडून नोटीस !

प्रतिकात्मक छायाचित्र

खुंटी (झारखंड) – तांबदा सिरकाटोली परिसरातील १० अल्पवयीन मुलांचे अवैधरित्या धर्मांतर केल्याच्या प्रकरणी खुंटी जिल्हा प्रशासनाने रोमन कॅथॉलिक चर्चकडे स्पष्टीकरण मागितले आहे. झारखंडमध्ये धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात आहे. (हा कायदा राज्यात भाजपची सत्ता असतांना करण्यात आला होता. आता हा कायदा नावालाच आहे, हे झारखंडमधील वाढत्या धर्मांतराच्या कारवायांवरून लक्षात येते ! – संपादक)

१. या प्रकरणी खुंटी जिल्हा प्रशासनाने तपकरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ‘धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०१७’ मधील तारतुदींनुसार प्रशासनाकडून आवश्यक अनुमती घेतली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रोमन कॅथॉलिक चर्चशी संबंधित असलेले पाद्री आणि अन्य ख्रिस्ती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

२. रोमन कॅथॉलिक चर्चचे प्रवक्ते विजय गुडीया यांनी सांगितले, ‘मुलांच्या संदर्भात झालेला कार्यक्रम म्हणजे धर्मांतर होण्याच्या अगोदरचे विधी होते. अल्पवयीन मुले आणि त्यांचे पालक यांनी धर्मांतरासाठी दिलेले अर्ज अजूनही चर्चकडे विचाराधीन आहेत. (प्रकरण अंगाशी आल्यावर पाद्री कशी साळसूदपणे उत्तरे देतात, याचे हे उदाहरण ! – संपादक) प्रशासनाने आमची मते लक्षात न घेताच तक्रार नोंदवली आहे. प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसीला आम्ही योग्य उत्तर देऊ’, ते सांगितले.

३. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची नोंद घेतली आहे. ‘परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल’, असे आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कनूनगो यांनी सांगितले. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून ‘१२ मुलांच्या धर्मांतर प्रकरणी कोणती कारवाई केली ?’ त्याचा अहवाल ३ दिवसात मागविला आहे.

संपादकीय भूमिका

झारखंड राज्यात हिंदुद्वेषी आणि ख्रिस्तीप्रेमी झारखंड मुक्ती मोर्च्याचे राज्य आहे. त्यामुळे तेथे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. राज्यातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !