कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसे यांसह ६ पक्षांना समन्स !

आयोगाचे कामकाज पूर्ण करणे आणि शासनास अंतिम अहवाल सादर करणे यांसाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव प्र.ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचे धनंजय महाडिक विजयी !

राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांपैकी भाजपचे ३, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १ उमेवार विजयी झाले. ६ व्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार, तर भाजपचे धनंजय महाडिक रिंगणात होते.

संभाजीनगर येथे भर पावसात सहस्रो मावळ्यांच्या उपस्थितीत ‘शंभू मेळावा-२’ उत्साहात साजरा !

शिवप्रहार प्रतिष्ठान आणि शिव-शंभू भक्त परिवार, महाराष्ट्र यांच्या वतीने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ व्हावे, याकरता अराजकीय मोहीम ६ मासांपासून चालू आहे.

आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रीकरण करण्यास बंदी !

आषाढी यात्रा कालावधीत गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे टेहळणी होऊ शकते. त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने बंदी घातली गेली आहे.

बलात्काऱ्यांचा देश ब्रिटन !

गुन्हेगारांना मोकाट सोडणाऱ्या ब्रिटनलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांनी वेळीच खडसवायला हवे आणि संबंधित आरोपींना कठोर शासन होईपर्यंत ब्रिटनचा जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करत त्याच्यावर सर्वदृष्ट्या बहिष्कारच घालायला हवा, तरच ब्रिटनला उपरती होईल !

‘हिराबाग वॉटर वर्क्स’ पाणीपुरवठा केंद्र आहे कि कचरा टाकण्याचे मैदान ! – स्वाती शिंदे, नगरसेविका

‘हिराबाग वॉटर वर्क्स’ परिसरात महापालिकेने कचर्‍याचे मैदान केले असून प्रभागांतील कचरा येथे टाकला जातो. यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

अनेक जिल्ह्यांतून ४५ दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड !

पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, नगर, नाशिक, हिंगोली, संभाजीनगर, नवी मुंबई या जिल्ह्यांतून गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुचाकी वाहने चोरणार्‍या अट्टल चोरांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ दुचाकी असा अनुमाने ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधिन करण्यात आला आहे.

पिंपरी (पुणे) महापालिकेचा ४०० कोटींचा मालमत्ता कर थकीत !

पिंपरी महापालिकेने कर संकलनाचे ९५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अद्याप जवळपास ५० सहस्र मालमत्ताधारकांचा ४०० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. तो वसूल करण्याकरता पालिकेच्या वतीने विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत.

जात प्रमाणपत्र रहित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !

जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते.

अशी मागणी का करावी लागते ?

‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.