आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रीकरण करण्यास बंदी !

जिल्हा प्रशासनाचे आदेश

सोलापूर, ११ जून (वार्ता.) – आषाढी यात्रा कालावधीत १२ ते १४ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे टेहळणी होऊ शकते. त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रीकरण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर केले आहेत.

ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रीकरण करण्यावर बंदी

आदेशात म्हटले आहे की, वारीमध्ये ग्रामीण भागातील भाविक अधिक संख्येने असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते, छायाचित्रण करतांना वारकर्‍यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) अखेर पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रीकरण करण्यावर बंदी घातली आहे.