अनेक जिल्ह्यांतून ४५ दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड !

चोरीस गेलेल्या दुचाकी

पुणे – पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, नगर, नाशिक, हिंगोली, संभाजीनगर, नवी मुंबई या जिल्ह्यांतून गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुचाकी वाहने चोरणार्‍या अट्टल चोरांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ दुचाकी असा अनुमाने ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधिन करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रमोद सुरकंडे, ज्ञानेश्वर बिबवे, गणेश कारखिले आणि आदिल मुक्तार अहमद कुरेशी या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे २९ मे या दिवशी एका महिलेचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वाराने चोरले होते. या घटनेचे सीसीटीव्हीद्वारे अन्वेषण केले असता संशयित म्हणून प्रमोद सुरकुंडे याला अटक केली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी करता ४५ दुचाकी गाड्या चोरल्याची घटना उघडकीस आली.

संपादकीय भूमिका

वाढते चोरीचे प्रमाण गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे द्योतक ! पोलिसांनी कार्यक्षमता वाढवावी, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?