हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘उपासनेची शक्ती’ वाढवा आणि ‘शक्तीची उपासना’ करा !

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश !

हिंदूंच्या पवित्र स्थानांना पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणे आवश्यक !

लक्षावधी हिंदूंनी रक्त सांडूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटणे, काशी विश्वेश्वराचे मंदिरही पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत !

शिवराज्याभिषेकदिन जपानमध्ये उत्साहात साजरा !

भारतीय दूतावास आणि ‘भारत कल्चरल सोसायटी जपान’ या संस्थेने संयुक्तपणे टोकियोमध्ये प्रथमच शिवराज्याभिषेकदिन साजरा केला.

दगाफटका करणाऱ्या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाफटका केला नाही. घोडेबाजारात उभे होते, त्यांची ६-७ मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणता व्यापार केला नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन !

श्री तुळजाभवानी मंदिरात झालेल्या अपहारातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच विशाळगडाचे रक्षण करून तेथील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील ७ नगरपालिकांसाठी १३ जूनला आरक्षण सोडत !

सातारा, कराड यांसह ७ नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम अंतिम झाला आहे. आता निवडणूक आयोगानेही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

उस्मानाबाद शहराचे नाव पूर्ववत् ‘धाराशिव’ करावे !

उस्मानाबाद शहराचे, तसेच जिल्ह्याचे प्राचीन नाव ‘धाराशिव’ असे होते. त्यामुळे ते नाव पूर्ववत् ‘धाराशिव’ करण्यात यावे, यासाठी १० सहस्र स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संभाजीनगर येथील ‘रामा इंटरनॅशनल’ येथे ८ जून या दिवशी ‘हिंदू राष्ट्र सेने’च्या वतीने देण्यात आले.

अंकली (बेळगाव) येथून टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा-मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान !

हे अश्व २० जून या दिवशी आळंदीत पोचणार आहेत. या अश्वप्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.