
संभाजीनगर – जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. समितीच्या या निर्णयाच्या विरोधात कायदेशीर आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात आव्हान याचिका प्रविष्ट केली होती. सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती आर्.डी. धानुका आणि न्यायमूर्ती एस्.जी. मेहरे यांच्या खंडपिठाने पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवून सोनवणे यांची आव्हान याचिका १० जून या दिवशी फेटाळली.
चोपडा मतदारसंघ वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. आमदार सोनवणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जगदीशचंद्र वळवी यांनी निवडणूक लढवली होती. वळवी यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी सातत्याने सोनवणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर