पिंपरी (पुणे) – पिंपरी महापालिकेने कर संकलनाचे ९५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अद्याप जवळपास ५० सहस्र मालमत्ताधारकांचा ४०० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. तो वसूल करण्याकरता पालिकेच्या वतीने विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत. त्याची मुदत ३० जूनपर्यंत असून मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
गेल्या वर्षी थकीत ३६ सहस्र ३९९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी केवळ २८६ मालमत्तांची जप्ती करण्यात आली होती. चालू वर्षी २ सहस्र ७०० मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यातील केवळ २ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून ही जप्तीची कारवाई अशीच चालू राहून थकबाकी वसुलीकरता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत का आहे ? वेळेत वसुली न करणार्यांनाही कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |