मुंबईमध्ये दुचाकीवरील दोघांनीही शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
मोटार वाहन नियमानुसार दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती यांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक आहे. मुंबईमध्ये या नियमाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. सध्या याविषयी पोलीस जनजागृती करत असून प्रत्यक्ष कारवाई १५ दिवसांनी चालू करण्यात येणार आहे.