शिवसेना नेते यशवंत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

शिवसेना नेते यशंवत जाधव

मुंबई – शिवसेना नेते यशंवत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावला आहे. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी त्यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये जाधव यांच्या विदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागाने त्यांच्या घरावर धाड टाकली होती. यात यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता कह्यात घेण्यात आल्या आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या बेनामी आस्थापनाची चौकशी केली होती. यामध्ये मोठ्या रकमेची त्यांच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचे दिसून आले होते. याविषयी संचालनालय चौकशी करणार आहे.