गडचिरोली येथे २ जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसर्मपण !

२५ मे या दिवशी १२ लाखांचे पारितोषिक असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांनी येथील पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे. रामसिंग उपाख्य सीताराम आत्राम आणि माधुरी उपाख्य भुरी उपाख्य सुमन मट्टामी अशी नक्षलवाद्यांची नावे आहेत.

जुन्या दगडी पुलावरील खड्ड्यांविषयी महर्षि वाल्मीकि संघाकडून शासनाला साडी-चोळीचा अहेर !

‘खड्ड्यांविषयी असंवेदनशील असलेले प्रशासन काय कामाचे ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? संघटनांनी प्रशासनाला जाग येईपर्यंत पाठपुरावा चालू ठेवावा.

‘सारथी संस्थे’ला भूखंड देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत !

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) नवी मुंबई येथील केंद्रासाठी भूखंड देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व शासकीय विभागांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त !

राज्यातील एकूण २९ शासकीय विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणारी विविध कार्यालये यांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सरकारच्या खात्यातील ही रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाली आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित !

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. जुलै मासात १० जागा रिक्त होणार असून यासाठी २० जून या दिवशी मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

माफीचा साक्षीदार बनण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अर्ज !

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्या अर्जाला सशर्त संमती दिली आहे.

खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पुणे येथील ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षांसह चौघांवर गुन्हे नोंद !

भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?

अमरावती येथे मांत्रिक अब्दुल रहीम याच्या अघोरी उपचारांमुळे तरुणाचा संशयास्पद मृत्यू !

मांत्रिक हा मुसलमान असल्याने त्याच्या विरोधात संपूर्ण पुरो(अधो)गामी टोळी मौन बाळगून आहे, हे लक्षात घ्या !

कोकण किनारपट्टीवर ३१ ऑगस्टपर्यंत जलक्रीडा व्यवसायाला बंदी

कोकण समुद्र किनारपट्टीवर २५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने दिला आहे. त्यामुळे आता पर्यटन हंगामात जलक्रीडा प्रकारांना आळा बसणार आहे.

क्षात्र आणि ब्राह्म तेजाचा हुंकार देणारी सातारा येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

पुरोगाम्यांना चपराक देत १ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमान्यांचा दिंडीत सहभाग ! दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि सातारा शहराचे ग्रामदैवत श्री ढोल्या गणपति यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.