हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाची मुसलमानांकडून हानी ! – हिंदु पक्ष

ज्ञानवापी प्रकरणाच्या २६ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यांचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने ३० मे या दिवशी पुढील सुनावणीच्या वेळी तो पूर्ण करण्यात येणार आहे.

जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !

बंगालमधील विद्यापिठांमध्ये आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असतील ‘कुलपती’ !

ही ममता बॅनर्जी सरकारची हुकूमशाही आहे, असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्रात राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकरणी कधीतरी जनहित साधतील का ?

पुणे शहरात ‘कर्ज अ‍ॅप’च्या माध्यमातून सहस्रोंची फसवणूक !

‘अल्पावधीत ५ सहस्र रुपयांपर्यंत कर्ज मिळेल’, असे संदेश पाहून अनेकजण ते ‘अ‍ॅप’ घेतात. त्वरित त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. ते पैसे ७ दिवसांमध्ये परत करायचे असतात; मात्र ६ व्या दिवसापासून त्यांचे पैसे मागण्याचे सत्र चालू होते.

वारीकाळात महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांविषयी नवीन निर्देश लागू !

या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

काम करतांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्यास तो अपघात आहे !

‘एखादा कामगार काम करत असलेल्या ठिकाणी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यास तो अपघात आहे’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कामगार हानीभरपाई आयुक्त तथा कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशांनी एका खटल्यात २५ मे या दिवशी दिला आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या ७ ठिकाणी ‘ईडी’च्या धाडी !

राज्याचे  परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील निवासस्थानी २६ मे या दिवशी सकाळी ६ वाजता अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. मुंबई, रत्नागिरी आणि पुणे येथील ७ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.

खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी देहली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

येथील खासदार नवनीत राणा यांना एका भ्रमणभाष क्रमांकावरून त्यांच्या वैयक्तिक दूरभाषवर सातत्याने शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.