कोल्हापूर, २४ मे (वार्ता.) – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नावाची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबई येथून केली आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. या संदर्भात संजय राऊत म्हणाले, ‘‘संजय पवार हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ते एक पक्के मावळे आहेत. मावळे असतात; म्हणून राजे असतात.’’ यानंतर शिवसैनिकांनी कोल्हापूर येथे आनंद व्यक्त केला.