नागपूर – महावितरणच्या कायमस्वरूपी खंडित वीज ग्राहकांकडे ६ सहस्र ४२३ कोटी रुपयांची वीज देयकांची थकबाकी आहे, तर यामध्ये उच्च दाब ग्राहकांकडे १ सहस्र १ कोटी आणि लघुदाब ग्राहकांकडे ५ सहस्र ४२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातून वीज ग्राहकांना दिलासा देतांनाच वसुली वाढावी यासाठी मार्चमध्ये तिसर्यांदा ‘विलासराव देशमुख अभय योजना’ आणण्यात आली आहे. ही योजना ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालू रहाणार आहे. सध्या राज्यात २ कोटी ८० लाख नियमित वीज ग्राहक आहेत. २ मार्च २०२२ च्या नोंदीनुसार राज्यात ३२ लाख १६ सहस्र ५०० ग्राहकांची वीज कायमस्वरूपी कापण्यात आली आहे.
या योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे, तसेच थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्च दाब ग्राहकांना ५ टक्के, तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकित मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून पुनर्जोडणी वा नवीन जोडणी घेता येणार आहे.
संपादकीय टिप्पणीवीज ग्राहकांकडे सहस्रो कोटी रुपयांची थकबाकी ठेवणार्या‘महावितरण’च्या अधिकार्यांकडूनच वसुली केली पाहिजे ! |