संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मनसेची मागणी !

संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी शिवसेनेकडे केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी करण्यात आली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी या मागणीचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

त्यात म्हटले आहे की,…

१. १८ डिसेंबर २००० या दिवशी ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये एका मुलाखतीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब म्हणतात, ‘‘संभाजीनगर येथे असलेले औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त झाले पाहिजे. ते पुन्हा बांधता कामा नये.’’ शिवसेनेचे हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचे तरी ऐकणार आहे का ? हे थडगे पाडले जाणार आहे का ?

२. शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची काय आवश्यकता आहे ? ही निजामाची औलाद येथे येऊन थडग्यावर नतमस्तक होईल, यासाठी हे थडगे ठेवले आहे का ?

३. आता हिंदुत्वनिष्ठांनी आपला चेहरा दाखवूनच द्यावा.

संपादकीय भूमिका

औरंगजेबाच्या थडग्याविषयी मनसेच्या मागणीविषयी सरकार काय भूमिका घेणार आहे ?