सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अभिवादन !

सोलापूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जुना पुणे नाका भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध मंडळे, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. सोलापूर शहरवासियांच्या वतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

१३ मेच्या मध्यरात्री जुना पुणे नाका परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बाळे येथील धर्मवीर शंभुराजे जन्मोत्सव समितीच्या वतीने महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. या वेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.