संभाजीनगर – येथील वादग्रस्त ठरलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात यावी. कबर पहाण्यासाठी पर्यटकांनी येऊ नये, अशी मागणी खुलताबाद येथील नागरिकांनी १७ मे या दिवशी अचानकपणे केली. त्यांनी पर्यटकांनाही कबरीच्या परिसरात येऊ दिले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत नागरिकांना शांत केले.
१. ‘एम्.आय.एम्.’चे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचे ‘दर्शन’ घेतले होते.
२. ‘छत्रपती संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या, तसेच स्वतःच्या भावालाही जिवानिशी मारणाऱ्या अन् जनतेचा क्रूरपणे छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या समोर कुणी नतमस्तक होऊच कसे शकते ?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
३. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची अज्ञातांकडून मोडतोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पर्यटकांना मशिदीत येण्याची अनुमती न देण्याचा आग्रह स्थानिकांनी केला आहे.
४. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तर औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘ही कबर उखडूनच का टाकू नये ?’, असा प्रश्न विचारला.
संपादकीय भूमिकाजी गोष्ट स्थानिकांच्या लक्षात येते, ती सरकारी यंत्रणांच्या का लक्षात येत नाही ? |