औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करण्याची मागणी !

नामांतरासाठी शिवसेना-भाजप एकत्र !

औरंगाबाद विमानतळ

नवी देहली – औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची १७ मे या दिवशी भेट घेतली. दोन्ही पक्षांनी ‘औरंगाबाद विमानतळाचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे.