पुण्यात अक्षय्य तृतीयेला होणार्‍या मनसेच्या महाआरतीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरांत ३ मे या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्यासह संलग्न असलेल्या ७ ते ८ संघटना कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

महामार्गावर वेगमर्यादा वाढवण्याची आवश्यकता ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

‘‘गाडीला वेगमर्यादा असलीच पाहिजे याविषयी माझा विरोध नाही; मात्र वेगमर्यादा किती असावी ? यावर विचार व्हायला हवा. आता ज्या पद्धतीने दंड वसूल केला जात आहे, त्याला माझा विरोध आहे.

मूल्यवर्धित कर विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक !

मूल्यवर्धित कर विभागातील (जी.एस्.टी.) अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यातील संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात गाभार्‍यात बसवण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कामगार कोणत्याही यंत्राचा वापर न करता पारंपरिक हत्यारे वापरून फरशी काढणार आहेत.

महाराष्ट्रात घातपाताचा कट ?

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी एका वाहनात पोलिसांना एकूण ९० तलवारी सापडल्या. ही शस्त्रास्त्रे राजस्थान येथून जालन्याकडे नेण्यात येणार होती.

हिंदीला विरोध !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वाेत्तर राज्यांमधील शाळांमधील हिंदीला आवश्यक विषय बनवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आसामसहित अनेक राज्यांनी त्याला विरोध दर्शवण्यास प्रारंभ केला आहे.

३ लाख रुपयांची लाच घेतांना संभाजीनगर महापालिकेच्या गुंठेवारी कक्षप्रमुखांना अटक !

यावरून महापालिकेत भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे स्पष्ट होते. महापालिकेत खालपासून वरपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या साखळीत संबंधित दोषी वरिष्ठ अधिकार्‍यांनाही अटक केली पाहिजे.

इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !

साहित्य, पत्रकारिता, सामाजिक माध्यमे, प्रशासन, शासन या प्रत्येक ठिकाणी आणि सामान्य नागरिकही मराठी बोलतांना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतांना आढळतात.

विभागीय क्रीडा संकुलाचे छत्रपती संभाजी महाराज हे नामकरण कायम ठेवण्याची मागणी

ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी प्राणत्याग केला असा दैदिप्यमान इतिहास असणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव क्रीडा संकुलाला देण्यासाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी आहे. यात तातडीने लक्ष घालून ही मागणी पूर्ण करणे अपेक्षित आहे !

पुणे येथे धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी तरुणास अटक !

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पिंपरी येथील तेजस वायदंडेने, रणजीत चव्हाण आणि अजय या तडीपार गुंडांना हातात कोयता घेत धमकी देत असल्याचा एक व्हिडिओ ‘इन्स्टाग्रामवर’ प्रसारित केला होता.