विभागीय क्रीडा संकुलाचे छत्रपती संभाजी महाराज हे नामकरण कायम ठेवण्याची मागणी

छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल

कोल्हापूर, १ मे (वार्ता.) – येथील ‘विभागीय क्रीडा संकुलाचे केलेले छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण कायम ठेवण्यात यावे आणि या संदर्भात १४ मेपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात यावी, अशी मागणी संभाजीनगर येथील मंडळांनी केली आहे. निर्णय न झाल्यास आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, अशी चेतावणी मंडळांनी विभागीय क्रीडा संकुलाला दिली आहे. विविध कारणांमुळे गेली ३ वर्षे हे सूत्र प्रलंबित आहे. (ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी प्राणत्याग केला असा दैदिप्यमान इतिहास असणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव क्रीडा संकुलाला देण्यासाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी आहे. यात तातडीने लक्ष घालून ही मागणी पूर्ण करणे अपेक्षित आहे ! – संपादक)