परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याच्या वेळी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
भावसोहळ्यात ‘ज्योत से ज्योत जगाओ…’ ही आरती म्हणत असतांना संपूर्ण शरिरावर रोमांच उभे राहिले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची आरती करण्यासाठी सर्व देवता उपस्थित आहेत’, असे जाणवत होते. हे अनुभवतांना मन पुष्कळ आनंदी झाले.