पुणे येथे धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी तरुणास अटक !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पिंपरी येथील तेजस वायदंडेने, रणजीत चव्हाण आणि अजय या तडीपार गुंडांना हातात कोयता घेत धमकी देत असल्याचा एक व्हिडिओ ‘इन्स्टाग्रामवर’ प्रसारित केला होता. त्या व्हिडिओमध्ये तेजसने हातात कोयता घेऊन छातीत कोयत्याने वार करण्याची भाषा वापरली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या शस्त्रविरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत तेजसला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

अश्लील शिवीगाळ करणे, शस्त्रे घेऊन धमकी देणे यांसारखे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याचे प्रकार वाढत जाणे गंभीर आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !