अलीगडमध्ये मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून ऐकवली जात आहे हनुमान चालिसा !

‘आम्ही याआधीही प्रशासनाला मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्यासाठी पत्र दिले होते; पण त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. यामुळेच आम्ही हनुमान चालिसा पठण केले’, असे अलीगडमध्ये युवा क्रांती मंचाकडून सांगण्यात आले आहे.

रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला ५० हून अधिक दिवस उलटले, तरी रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘गोशाळा अर्थव्यवस्था’ यांवर नीती आयोग करत आहे विचार !

‘आम्ही केवळ गोशाळांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या शक्यता तपासून पहात आहोत. शेणाच्या जोडउत्पादनांसाठी काय करता येईल, याचा अभ्यास चालू आहे’, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली.

विवेक अग्निहोत्री आता देहली दंगलीवर ‘द देहली फाइल्स’ चित्रपट बनवणार !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली आहे. ‘द देहली फाइल्स’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू सेनेने जेएनयू बाहेर लावले भगवे ध्वज आणि ‘भगवा जेएनयू’ लिहिलेली भित्तीपत्रके !

याविषयी देहली (दक्षिण पश्‍चिम) विभागाचे पोलीस उपायुक्त मनोज सी. यांनी सांगितले की, जेएनयूच्या आजूबाजूला रस्त्यावर काही झेंडे आणि भित्तीपत्रके लावण्यात आल्याचे आमच्या पहाण्यात आले आहे. ते त्वरित काढून टाकण्यात आले आहेत.

ऋषींचे श्रेष्ठत्व !

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्रांविना आणि संशोधनाविना अंतिम सत्य सांगणारे ऋषि !’

मुंबई विमानतळावर २४ कोटी रुपयांचे हेरॉईन कह्यात !

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.) मुंबई विमानतळावर एका परदेशी व्यक्तीकडून ३ किलो ९८ ग्रॅम अमली पदार्थ (हेरॉइन) कह्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनचे मूल्य २४ कोटी रुपये इतके आहे.

‘१४ एप्रिल’ या दिवशी १४ ‘ट्वीट’ करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदुविरोधी धोरणांची केली पोलखोल !

१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती) या दिवशी सलग १४ ‘ट्वीट’ करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदू यांच्या विरोधातील धोरणांची पोलखोल केली.

रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रतन यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली भेट !

श्री. रमेशचंद्र रतन यांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यावर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे कधीही रेल्वेशी संबंधित काही साहाय्य पाहिजे असल्यास मी सेवेसाठी सदैव तत्पर आहे.’’