८ राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काही टक्के असलेल्या हिंदूंना जरी अल्पसंख्यांक दर्जा मिळाला, तरी तेथील हिंदूंना त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण यामुळे मुसलमानांचा ‘अल्पसंख्यांक’ दर्जा रहित होणार नाही. त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल.

१५ एप्रिलला नवा घोटाळा उघडकीस आणणार ! – किरीट सोमय्या, भाजप

उद्या (१५ एप्रिल) महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार आहे, अशी चेतावणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १४ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मी ‘नॉट रिचेबल’ का झालो होतो ? याचे उत्तरही या वेळ देईन, असे सोमय्या म्हणाले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मुंबई आणि नवी मुंबई येथील २९ मंदिरांत साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यापासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत, हे स्पष्ट दिसत आहे ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

विशिष्ट पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत आहे ? ज्या परिस्थितीत अटक टाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावरून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात चालू आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागाकडून वीजदेयकांच्या थकित रकमेचा भरणा !

वीजदेयकांची रक्कम वेळेत न भरल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सहस्रावधी शाळांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. याविषयीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक झाली.

महाराष्ट्रातील मद्यविक्रीत १७ टक्के वाढ !

मद्यसम्राटांसाठी युवापिढीला मद्यपी बनवून महसूल मिळवायचा कि युवा पिढीला सक्षम बनवायचे ? हे सरकारने ठरवावे. मद्याच्या विक्रीत होणारी वाढ, ही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही !

अध्यात्माचे पुढील टप्पे गाठल्यास साधनेतील खरा आनंद अनुभवता येतो ! – पू. अशोक पात्रीकर

शालेय जीवनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी असे शिक्षणाचे टप्पे गाठत पुढे जायचे असते, त्याचप्रमाणे अध्यात्मामध्येही नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच भावजागृती असे पुढचे पुढचे टप्पे…

वज्रलेपाची झीज थांबवण्याचा अहवाल ५ मेपर्यंत पुरातत्व विभागाला सादर करा ! – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज झाल्याचे प्रकरण, मूर्तीचे संवर्धन आणि वारकऱ्यांच्या भावनांचा आदर यांची सांगड घालून उपाययोजना काढण्याचे निर्देश

नागपूर येथून ‘एस्.टी.’चे कर्मचारी संदीप गोडबोले यांना अटक !

सिल्व्हर ओक आक्रमण प्रकरण, १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ! पुण्यातील एक पत्रकार कह्यात !

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कह्यात !

सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावूनही ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे सातारा पोलिसांनी गिरगाव न्यायालयात ‘सदावर्ते हे चौकशीसाठी कह्यात मिळावेत’, अशी मागणी केली होती.