‘१४ एप्रिल’ या दिवशी १४ ‘ट्वीट’ करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदुविरोधी धोरणांची केली पोलखोल !

मुंबई, १४ एप्रिल (वार्ता.) – १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती) या दिवशी सलग १४ ‘ट्वीट’ करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदू यांच्या विरोधातील धोरणांची पोलखोल केली. यामध्ये मुंबई बाँबस्फोट, आतंकवादी इशरद जहाँ हिच्याविषयी सहानुभूती, काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्रशासनाच्या भूमिकेला विरोध, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला विरोध आदी विविध प्रकरणी शरद पवार यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांच्या बातम्यांचे संदर्भही या ‘ट्वीट’ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

यांतील एका ‘ट्वीट’ मध्ये फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘कलम ३७०’ला कडाडून विरोध केला असल्याचे नमूद करत शरद पवार यांनी या कलमाचे समर्थन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात घेतलेली भूमिका मांडली आहे. आतंकवाद्यांशी असलेल्या संबंधांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना झालेल्या अटकेनंतर ते मुसलमान आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जात असल्याचे धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान शरद पवार यांनी केले. याविषयीही फडणवीस यांनी ‘ट्वीट’ केले आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराला दुर्लक्षित करून धर्मांधांची तळी उचलून धरणारे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी शरद पवार यांच्या वक्तव्याचे वृत्तही फडणवीस यांनी ‘ट्वीट’ केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांची हत्या करण्याची योजना आखणाऱ्या आतंकवाद्यांतील एक इशरत जहाँ निर्दाेष असल्याचे सांगत तिच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारे शरद पवार यांच्या वक्तव्याचे वृत्तही फडणवीस यांनी ‘ट्वीट’ केले आहे. फडणवीस यांनी केलेल्या ‘ट्वीट’ मध्ये वर्ष २०१२ मधील आझाद मैदानावर रझा अकादमीने घडवलेल्या दंगलीनंतर करण्यात न आलेली कठोर कारवाई, राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची सुविधा नसतांना मुसलमानांना धर्माच्या आधारे आरक्षण मिळण्यासाठी शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार, मुंबईमध्ये १२ बाँबस्फोट झाले असतांना तेरावा बाँबस्फोट झाल्याची खोटी माहिती देऊन मुसलमानांविषयी सहानुभूती निर्माण करणाऱ्या शरद पवार यांनी मात्र हिंदूंनी आतंकवाद केल्याची एकही घटना अस्तित्वात नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दाचा प्रथम उच्चार केला.