संभाजीनगर – मुंबई येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना खासदारांची २८ एप्रिल या दिवशी बैठक झाली. या वेळी सेनेचे नेते, प्रवक्ते आणि खासदार उपस्थित होते. ‘भाजप आणि विरोधक यांच्यावर तुटून पडा’, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिल्या. राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे ज्या ठिकाणी सभा होईल, त्याच ठिकाणी ८ जून या दिवशी उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे बैठकीत निश्चित झाले.