नवी मुंबई – कोरोनाच्या संसर्गाच्या काळात आरोग्य सेवेत तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या ४०० कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
मार्च २०२० मध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण मिळायला लागले. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेने आरोग्य विभागात १ सहस्र ९११ जणांची तात्पुरती भरती केली. तिसरी लाट ओसरल्यावर पालिकेने पहिल्या टप्प्यात ८३७ कर्मचार्यांना कार्यमुक्त केले. आता दुसर्या टप्प्यात ४०० जणांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.