युद्धासाठी रशियाला उत्तरदायी धरले पाहिजे ! – ‘जी सेव्हन’ राष्ट्रे

ब्रुसेल्स – अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या ७ राष्ट्रांचा गट असणार्‍या ‘जी सेव्हन’ संघटनेतील राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशिया अन् युक्रेन यांच्या युद्धाविषयी म्हटले की, युक्रेनमध्ये सर्वसामान्यांवर केलेल्या सैनिकी आक्रमणासाठी जे लोक कारणीभूत आहेत, त्यांना उत्तरदायी धरले पाहिजे. या आक्रमणामध्ये ‘क्लस्टर’ बाँबसारख्या बंदी घालण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने या गुन्ह्यांसाठी योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.

१. ‘जी सेव्हन’ने येथे घेतलेल्या एका बैठकीनंतर म्हटले की, रशियाचे आक्रमण ही चिंतेची गोष्ट आहे. शांतता आणि सुरक्षा या दोन गोष्टींना प्राधान्य आहे. त्यामुळेच आम्ही या युद्धासाठी रशियाला उत्तरदायी ठरवण्याच्या संदर्भात चर्चा केली.

२. वर्ष २०१४ मध्ये रशियाने युक्रेनमधील क्रिमिया प्रांतावर आक्रमण करून तो कह्यात घेतल्यानंतर या राष्ट्रांच्या गटातून रशियाला काढून टाकण्यात आले होते. त्यानंतरही रशियाने क्रिमियावरील दावा सोडला नाही.