रशिया-युक्रेन युद्धाचा अचूक अंदाज न बांधल्याचा ठेवण्यात आला ठपका !
पॅरिस – फ्रान्सचे गुप्तचर विभागाचे प्रमुख जनरल एरिक विदाऊद यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने प्रसारित केले आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा अचूक अंदाज न बांधल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.
French intelligence chief Vidaud fired over Russian war failings https://t.co/diwI6eNC3j
— BBC News (World) (@BBCWorld) March 31, 2022
अन्य एका वृत्तानुसार विविध विषयांवर त्यांचे अपूर्ण ज्ञान असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अमेरिकेने रशियाच्या युद्धासंदर्भातील योजनांचे अंदाज बरोबर बांधले, जे फ्रान्सला बांधता आले नाहीत, असे सूत्रांकडून समजते.