दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या धर्मांध पोलीस अधिकार्‍याला ९ वर्षांनंतर जन्मठेप

९ वर्षांनंतर पीडितांना न्याय मिळणे हा न्याय नसून अन्यायच होय ! – संपादक

धर्मांध कितीही शिकले आणि उच्चपदावर पोचले, तरी त्यांच्यातील वासनांधता आणि गुन्हेगारी वृत्ती नष्ट होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

शिलाँग (मेघालय) – मेघालयाच्या एका विशेष न्यायालयाने २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नुरुल इस्लाम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच ८ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या २ मुली बहिणी आहेत. नुरुल याला यापूर्वीच पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बलात्काराची घटना वर्ष २०१३ मध्ये झाली होती. नुरुल याने पहिल्यांदा १३ वर्षांच्या मुलीवर पोलीस ठाण्यात, तर नंतर तिच्या घरी जाऊन तिच्या १७ वर्षीय बहिणीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला होता. दोघांनाही याविषयी कुणालाही सांगितल्यास खोट्या आरोपाखाली अटक करण्याची त्याने धमकी दिली होती.

१. याविषयी मुलींच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर नुरुल याला अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर त्याच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली होती. पोलीस ठाण्याला घेरावही घालण्यात आला होता. त्याला पोलीस ठाण्याच्या कोठडीतून दुसरीकडे स्थलांतरित करत असतांना त्याने पलायनही केले होते. त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.

२. या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानेही याविषयी मेघालय सरकारकडे अहवाल मागितला होता. तसेच नुरुल याला कोठडीऐवजी निवासस्थानी ठेवल्याचा आणि विशेष सुविधा पुरवल्याचा आरोप केला होता.