
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव आतंकवादी अजमल कसाब याचा पाकमधील पत्ता पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीच भारताला दिला होता. त्यामुळेच कसाबचे घर पाकमधील फरीदकोट येथे असल्याचे भारताला कळाले’, असा दावा पाकचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी केला. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते. ‘मी अत्यंत दायित्वाने हा आरोप केला आहे. जर ही माहिती खोटी ठरली, तर मी कोणतीही शिक्षा भोगायला सिद्ध आहे’, असेही रशीद यांनी पुढे सांगितले.
#WATCH Nawaz Sharif gave the address of Ajmal Kasab to India. I stand with you,interior minister of Pakistan Sheikh Rashid pic.twitter.com/Tr7AEoe1R5
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) March 30, 2022
रशीद पुढे म्हणाले की, नवाज शरीफ आणि त्यांचे बगलबच्चे विकले गेले आहेत. पाकिस्तानच्या राजकारणातील ही कीड आहे. पैसे खाऊन यांनी इमान गहाण ठेवला आहे. पाकिस्तानसाठी हे कलंक आहेत. सद्दाम हुसेन, मुअम्मर गद्दाफी आणि ओसामा बिन लादेन या तिघांकडून शरीफ पैसा उकळत होते. गद्दाफीसमवेतच्या कराराचा तर मी साक्षीदार आहे, असा आरोपही शेख रशीद यांनी केला.
(सौजन्य : TV9 मराठी)
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण