जर पंतप्रधान मोदी मध्यस्थ होण्यास इच्छुक असतील, तर आम्ही स्वागत करू ! – युक्रेन

रशिया-युक्रेन युद्धाचे प्रकरण

(डावीकडून ) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

कीव (युक्रेन) – जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थाची भूमिका निभावण्यास इच्छुक असतील, तर आम्ही त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत करू. आम्ही विनंती करतो की, तुमचे रशिया आणि पुतिन यांच्यासमवेत असलेल्या चांगल्या संबंधांचा लाभ घेत हे युद्ध थांबवा, असे आवाहन युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केले आहे. दिमित्रो कुलेबा यांना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात मधस्थी करावी का?’, असे विचारण्यात आले असता त्यांनी हे उत्तर दिले.  ‘रशियात एकमेव व्यक्ती सर्व निर्णय घेत आहे आणि ती म्हणजे पुतिन. त्यामुळे हे युद्ध कसे थांबवावे, यासाठी तुम्ही थेट त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. केवळ पुतिन यांनाच युद्ध हवे आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘रशियाचा चांगला मित्र असल्याने भारताने मध्यस्थी करावी’ अशी मागणीही याआधी युक्रेनच्य राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्याकडून करण्यात आली होती.

सौजन्य :NDTV

दिमित्रो कुलेबा म्हणाले की, आम्ही नेहमीच भारतीय अन्न सुरक्षेचे हमीदार राहिलो आहोत. आम्ही तुम्हाला नेहमी सूर्यफूल तेल, धान्य आणि इतर उत्पादने पुरवतो. हे एक लाभदायक नाते आहे.