आर्थिक वाढीचा दर ८ ते ८.५ टक्के रहाण्याचा अंदाज ! – केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन्

आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.

संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून राजकारण !

१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी ‘महापौर आपल्या दारी’ अभियान ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

या अभियानामध्ये पुष्कळ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या समस्या कुणामुळे राहिल्या त्यांनाही शिक्षा करावी, हीसुद्धा जनतेची अपेक्षा !

३० जानेवारीलाच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचा पूर्ण क्षमतेने किरणोत्सव !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असा आहे. मात्र ३० जानेवारी या दिवशीच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याचे पहायला मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कोणताही पक्ष निवडून आला, तरी भारताची स्थिती आणखीन बिघडणार आहे, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ७४ वर्षांच्या अनुभवावरून जनतेला ज्ञात असल्याने ती निवडणुकीच्या निकालाची नाही, तर हिंदु (ईश्वरी) राष्ट्राच्या स्थापनेची वाट पहात आहे !’

संकेश्वर मठ (कर्नाटक) येथील मठ रथोत्सव आणि यात्रा ६ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणार !

यानिमित्ताने वेदपारायण, महारुद्राभिषेक, रुद्रपंचायतन, श्रीसुक्त होम यांचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापकांनी केले आहे.