आर्थिक वाढीचा दर ८ ते ८.५ टक्के रहाण्याचा अंदाज ! – केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन्

वर्ष २०२२-२३ चे आर्थिक सर्वेक्षण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाला

नवी देहली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून प्रारंभ झाले आहे. पहिल्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत वर्ष २०२१-२२ चे आर्थिक सर्वेक्षण सादर केले. या सर्वेक्षणानुसार वर्ष २०२२-२३ मध्ये आर्थिक वाढीचा दर ८ ते ८.५ टक्के असा अंदाज आहे. हे चालू आर्थिक वर्षातील ९.२ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा अल्प आहे. आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना त्यांनी कोरोना महामारीपासून आतापर्यंत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.