प्रेमभाव आणि अखंड नामजप करणार्‍या पू. (सौ.) पद्मावती बाळासाहेब केंगेआजी (वय ८९ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. केंगेआजी पुष्कळ प्रेमळ आणि आदर्श गृहिणी होत्या. वृद्धापकाळामुळे बुद्धीवर नियंत्रण नसतांनाही त्यांचा अखंड नामजप चालू होता. घरी आलेल्यांना तसेच घरातील व्यक्तींनाही त्या सतत नामजप करायला सांगत असत.

यावल (जिल्हा जळगाव) येथील श्रीमती शकुंतला फिरके यांच्याकडून भारत विद्यालयाला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !

या वेळी शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. पी.एच्. महाजन यांच्यासह संस्थेचे सचिव श्री. हर्षद महाजन, तसेच मुख्याध्यापिका सौ. तिलोत्तमा चौधरी आणि शिक्षक उपस्थित होते.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ‘अग्नीसुरक्षा ऑडिट’ची माहिती देण्यास मुंबई महानगरपालिकेची टाळाटाळ !

हा प्रकार महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराविषयी संशय निर्माण करणारा आहे. आगीसारख्या संवेदनशील घटनांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असेल, तर कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कारवाई व्हायला हवी !

मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेची पहाणी करण्याचे न्यायालयाचे आदेश !

जनतेला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागत असेल, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या नावांचे पांढरे हत्ती पोसायचे तरी कशासाठी ?

खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य ! सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला असून आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे.

पेण (जिल्हा रायगड) येथे अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार

बलात्काराच्या वाढत्या घटना या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद ! बलात्कार्‍यांना तत्परतेने कडक शासन होत नसल्याने या घटनांचा अंत होत नाही !

‘आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही आणि म्हणणारही नाही !’

एकीकडे मद्यपानाच्या वस्तूंवर धोक्याची सूचना लिहायची आणि दुसरीकडे त्याची सर्रास विक्री करायची, हे मद्यपानाचे एकप्रकारे समर्थन केल्यासारखेच आहे.

धर्मांधांची खुनशी वृत्ती !

अवमानाच्या घटनेच्या संदर्भात सहिष्णु हिंदू वैध मार्गाने निषेध करत आहेत, हेही नसे थोडके. हिंदूंचे व्यापक आणि प्रभावी संघटनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान अन् त्यांच्यावरील आक्रमणेही रोखेल हे निश्चित !

रस्त्यावर थुंकणारे आणि कचरा फेकणारे यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिका १ सहस्र ‘क्लीन-अप मार्शल’ नियुक्त करणार !

आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी जनतेला स्वच्छता, शिस्त न शिकवल्याचा आणि पर्यायाने नागरिकांच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम निर्माण न केल्याचा हा परिणाम आहे !

किर्लोस्करवाडी ते भिलवडी विद्युत् रेल्वेची चाचणी यशस्वी !

मध्ये रेल्वेकडून पुणे-मिरज-लोंढा या मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी किर्लाेस्करवाडी ते भिलवडी या १४ किलोमीटर रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.