कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असा आहे; मात्र ३० जानेवारी या दिवशीच मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे देवीच्या पूर्ण मूर्तीवर पोचली आणि देवीचे मुखकमल उजळून गेले. त्यामुळे ३० जानेवारी या दिवशीच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याचे पहायला मिळाले.