पुणे – टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे ८ डिसेंबर या दिवशी निधन झाले. तेलंग यांनी ३ दशके टाटा मोटर्समध्ये सेवा केली आहे. ते वर्ष २०१२ मध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ विवाहित मुली असा परिवार आहे. टाटा मोटर्सच्या ‘४०७’ या टेम्पोच्या आणि ‘छोटा हत्ती’ (टाटा एस्.) या वाहनांच्या निर्मितीमध्ये त्यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे. टाटा उद्योग समुहातील अवजड आणि व्यापारी वाहन उत्पादन व्यवस्थापन, संशोधन क्षेत्र यांत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.