(म्हणे) ‘आम्ही भारताप्रमाणे हिंसेच्या घटनांकडे दुर्लक्ष करत नाही !’

भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ?

भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ? – उत्तरप्रदेशचे दुग्धविकास मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण

भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ?, असा प्रश्‍न उत्तरप्रदेशचे दुग्धविकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला.

स्वित्झर्लंड सरकारकडून इच्छामरण देणार्‍या यंत्राला कायदेशीर मान्यता

स्वित्झर्लंडमध्ये वर्ष १९४२ पासून इच्छामरण कायदेशीर आहे. स्वित्झर्लंड सरकारने आता ‘इच्छामरण यंत्रा’ला (‘सुसाइड पॉड’ला) कायदेशीर मान्यता दिली आहे. या यंत्राच्या साहाय्याने गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना न होता ते शांतपणे मृत्यू स्वीकारू शकतात.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण सैनिक करत असल्याने आपले जीवन सुरक्षित आहे ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

मी एक भारतीय म्हणून मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

वर्ष २०१८ पासून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई नाही ! – केंद्र सरकार

केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या २ सहस्र रुपयांच्या केवळ १.७५ टक्के नोटाच चलनात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणी ७ मासांत पावणे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

अशा प्रकरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ होणे, ही सामाजिकदृष्ट्या खेदाची गोष्ट आहे. उलट सरकार आणि प्रशासन यांनी याविषयी जागरुकता निर्माण करून हे प्रमाण दिवसेंदिवस घटत कसे जाईल हे पहाणे आवश्यक आहे !

सरकारी निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा लहान संस्था स्थापन करून कार्यरत रहाण्याचा प्रयत्न

डावपेचात हुशार असणार्‍या जिहादी संघटना ! केंद्र सरकारने याच विचार करून लवकरात लवकर राष्ट्रघातकी कारवाया करणार्‍या अशा संघटनांवर बंदी घालावी !

सावंतवाडी शहरात दुचाकींच्या अपघातानंतर पोलिसांची अल्पवयीन दुचाकीचालकांच्या विरोधात मोहीम

या अपघाताची गंभीर नोंद घेत पोलिसांनी महाविद्यालयीन आणि अल्पवयीन दुचाकी चालकांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या वेळी अनेकांच्या गाड्या कह्यात घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य दालनाला भेट !

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सपत्नीक भेट देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथकक्षांमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या साहित्याचे ग्रंथ खरेदी केले.

म्हणे शिक्षणसम्राट !

‘एका तरी शिक्षण- सम्राटाने ऋषिमुनींसारखे शिक्षणक्षेत्रात कार्य केले आहे का ? हल्लीचे शिक्षणसम्राट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसे मिळवणारे सम्राट !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले