
मथुरा (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ?, असा प्रश्न उत्तरप्रदेशचे दुग्धविकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि अन्य मंत्री यांनी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीवर श्रीकृष्ण मंदिर बांधण्याविषयीचे विधाने केली होती. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला चौधरी लक्ष्मी नारायण यांनी वरील उत्तर दिले.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत वक्तव्य केले आहे.https://t.co/AgDGK8crA6#Mathura #MathuraTemple #UttarPradesh
— ABP माझा (@abpmajhatv) December 8, 2021
चौधरी लक्ष्मी नारायण पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीत ज्या ठिकाणी ईदशाह मशीद आहे, तेथे पूर्वी कंसाचा कारागृह होता आणि त्यात बंद असणार्या देवकी आणि वासुदेव यांनी त्यांच्या आठव्या बालकाला अर्थात् श्रीकृष्णाला जन्म दिला होता. त्यामुळे आम्ही तेथेच श्रीकृष्ण मंदिर बांधणार आहोत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म तेथे झाला असल्याने मंदिरही तेथेच बांधले गेले पाहिजे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार