सरकारी निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा लहान संस्था स्थापन करून कार्यरत रहाण्याचा प्रयत्न

डावपेचात हुशार असणार्‍या जिहादी संघटना ! केंद्र सरकारने याच विचार करून लवकरात लवकर राष्ट्रघातकी कारवाया करणार्‍या अशा संघटनांवर बंदी घालावी ! – संपादक

नवी देहली – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या परिस्थितीत स्वतःचे कार्य निर्विघ्नपणे चालू रहाण्यासाठी पी.एफ्.आय.कडून देशभरात वेगवेगळ्या नावांनी लहान लहान संस्था स्थापन करण्याची सिद्धता केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संस्थांची नोंदणी स्थानिक निबंधक कार्यालयात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारची रणनीती आखण्याचा निर्णय पी.एफ्.आय.च्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राज्य पोलीस दल यांच्यासह विविध सरकारी संस्थांनी पी.एफ्.आय.च्या विरोधात अनेक गुन्हे आणि खटले प्रविष्ट केले आहेत. त्यामुळे भविष्यात या संघटनेवर बंदी येण्याची शक्यता आहे.