स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला वंदन करून केली ग्रंथांची खरेदी !
नाशिक, ५ डिसेंबर (वार्ता.) – नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सपत्नीक ५ डिसेंबर या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथकक्षांमधील स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य दालनाला भेट दिली. या वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या साहित्याचे ग्रंथ खरेदी केले.
‘व्यास क्रीएशन्स’ या पुस्तक प्रकाशकांच्या वतीने हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ग्रंथांचे दालन उभारण्यात आले होते. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर परिवार विशेषांकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विशेष सवलतीद्वारे हा ग्रंथ व्रिकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. व्यास क्रीएशनचे संचालक नीलेश गायकवाड यांनी माई सावरकर आणि ‘धगधगते यज्ञकुंड : वि.दा. सावरकर’ या ग्रंथांनाही विशेष प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.
‘ये मृत्यो ये…’ या ग्रंथाचे प्रकाशनसाधना योगेश जोशी यांनी लिहिलेल्या ‘ये मृत्यो ये…’ या ग्रंथाचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक दीपक करंजीकर, आणि डॉ. गिरीश पिंपळे यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मृत्यूविषयक विचार देण्यात आले आहेत. हा ग्रंथ व्यास क्रीएशन्सचे व्यवस्थापक यांच्याकडून ८९२८९६०६१०, ९९२०९४९१७७ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करून उपलब्ध होऊ शकेल. |