भारतात हिंसाचार करणार्या हाफीज सईदसारख्या असंख्य जिहादी आतंकवाद्यांना पोसणार्या पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांचे हास्यास्पद विधान !
भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ? – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या नागरिकाची ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या केल्याच्या प्रकरणी पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ‘या घटनेवरील पाकिस्तानी समाज आणि सरकार यांची प्रतिक्रिया हेच स्पष्ट करते की, आम्ही भारत नाही’, असे विधान केले. फवाद चौधरी यांच्या या विधानाचा अर्थ आहे की, भारतात मुसलमानांच्या विरोधात सातत्याने हिंसा घडत असून भारत त्याकडे लक्ष देत नाही; परंतु पाकने श्रीलंकेच्या नागरिकाच्या घटनेविषयी लगेच प्रतिसाद दिला. ‘पाकचे सरकार प्रत्येक अल्पसंख्यांक समुदायाला संरक्षण देण्यास बांधील आहे’, असेही फवाद चौधरी म्हणाले. (पाक सरकार अल्पसंख्यांक समुदायाला संरक्षण देत असते, तर तेथील हिंदूंचा वंशसंहार झाला नसता आणि हिंदु तरुणींचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर झाले नसते ! – संपादक)
Fawad Chaudhry said the Pakistani society and the government’s response to the Sialkot lynching prove that “we are not India.”
Read details: https://t.co/KwkESibNyt…#TheNews pic.twitter.com/CS3sJyCeNS
— The News (@thenews_intl) December 7, 2021
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !