|
गौहत्ती (आसाम) – मोगलांच्या राजवटीत देशाने जे पाहिले, तेच मी सांगत आहे. एका इतिहासकाराने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे, ‘औरंगजेबाने अनेक मंदिरांना भूमी दान केली होती. अन्य मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती. यांतील कामाख्या मंदिर हे एक आहे’, असा दावा आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे (‘ए.आय.यू.डी.एफ्.’चे) आमदार अमिनुल इस्लाम यांनी केला.
AIUDF MLA Aminul Islam says Aurangzeb donated land for the Kamakhya Temple, Hindu org files complaint: Detailshttps://t.co/qPeXfBgDXW
— OpIndia.com (@OpIndia_com) December 6, 2021
आमदार अमिनुल इस्लाम यांनी पुन्हा असे विधान केल्यास त्यांना कारागृहात जावे लागेल ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची चेतावणी
खोटा इतिहास सांगणार्यांना अशा प्रकारची चेतावणी देणारे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे अभिनंदन ! – संपादक
आमदार अमिनुल इस्लाम यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, अमिनुल इस्लाम यांनी पुन्हा असे वक्तव्य केल्यास, त्यांना कारागृहात जावे लागेल. माझ्या सरकारच्या काळात आपली सभ्यता आणि संस्कृती यांविरुद्धची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. जर त्यांना कारागृहाच्या बाहेर रहायचे असेल, तर ते अर्थशास्त्रावर बोलू शकतात, तसेच्या आमच्यावर टीकाही करू शकतात. कामाख्या, शंकरदेव, बुद्ध, महावीर जैन आणि महंमद पैगंबर यांना यामध्ये कुणीही ओढू नये.