पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन विशेषांक भेट !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले.

संप चालू असतांना कणकवली-सावंतवाडी मार्गावर पोलीस बंदोबस्तात परिवहन महामंडळाची बसवाहतूक चालू करण्याचा प्रयत्न

एस्.टी.च्या सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक प्रकाश रसाळ, पोलीस अधिकारी आणि एस्.टी.चे अन्य अधिकारी यांच्या साहाय्याने ही बससेवा चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कोल्हापूर येथे रेल्वेच्या डब्याला लागली आग !

‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागली होती आणि यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीत रेल्वेचा डबा पूर्णपणे जळून गेला आहे.

सोयीनुसार गांधी आठवणार्‍या मेहबूबा मुफ्ती !

‘सध्याचा भारत गांधी यांचा नाही, तर नथुराम गोडसे याचा वाटत आहे. येथे लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्यही नाही’, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

अधर्मी राजकारण्यांना त्यांनी केलेल्या पापकर्मांची फळे भोगावीच लागतात !

सृष्टीच्या कर्मफलन्यायाच्या सिद्धांतानुसार, पापी माणसाला त्याच्या दुष्कर्मांची फळे भोगावीच लागतात. जर एखाद्याने समष्टी पाप केले, तर त्याला व्यष्टी पाप करणार्‍यापेक्षा अधिक कठोर शिक्षा या लोकात आणि परलोकात दोन्हीकडे भोगावी लागते.

‘हलाल’ चालू झाल्यापासून ‘हलाल’ला झटका द्यायला हवा, हे सरकारला का कळले नाही ?

हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यामुळे प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते.

विश्वाची आजची स्थिती !

एकीकडे मानव औद्योगिकीकरण करून वेगाने प्रगती करत आहे. मानव ‘मंगळ’ ग्रहावर उतरू शकेल, तर दुसरीकडे मानव आणि मानवता यांच्या पुढे एकापेक्षा एक भयावह समस्या ‘आ’वासून उभ्या आहेत.

ईश्वर केवळ आपल्या कृत्यांचा साक्षीदार असतो आणि त्यांचे फळ आपल्याला देतो !

‘देव आपण केलेल्या कर्माचे फळ देतो’, अशी म्हण प्रचलित आहे. खरे तर ईश्वर आपण करत असलेल्या कृत्यांचा केवळ साक्षीदार असतो. आपण कर्म करतो, त्याच वेळी त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्यावर होतो.

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांचा केलेला तुलनात्मक अभ्यास

आज आपण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांचा केलेला तुलनात्मक अभ्यास येथे देत आहोत.

प्रेमभाव, उत्तम नियोजनकौशल्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) आश्रमातील श्री. गिरीश पाटील !

७.१२.२०२१ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संशोधनाशी निगडित सेवा करणारे श्री. गिरीश पाटील यांचा २५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त सहसाधक श्री. आशिष सावंत यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.