
पोर्ले तर्फ ठाणे (तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर) – येथे ५ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन विशेषांक भेट दिला. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी शिवसेना महिलाआघाडीच्या पोर्ले तर्फ ठाणेच्या शाखाप्रमुख सौ. चंद्रभागा चौगुले, शिवसेनेच्या सौ. माया चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, तसेच बजरंग दलाचे उपाध्यक्ष श्री. ऋषिकेश चौगुले उपस्थित होते.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची ‘लेट्सअप न्यूज पोर्टल’कडून मानहानी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप